बाजी या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा तो हिराच्या गळ्याला विळी लावून तिला जेरबंद करतो आणि दरवाज्याकडे घेऊन जाण्यास सांगतो. या झटापटीत हिराला गळ्याला दुखापत झाली. भोर येथील वाडयात या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. तातडीने तिच्यावर उपचारही झाले.

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा‘ या कार्यक्रमातून प्रेमाचे विविध रंग आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना दाखवण्यात येतात. रविवार ३० सप्टेंबरला अशीच एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या खास भागाचं नाव असेल ‘पिंजरा’.

कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग' च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी झी टॉकीजच्या प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा यावाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील तितक्याच धमाकेदारपणे होणार आहे कारण झी युवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' ही नवी मालिका सादर करणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची.

‘स्टार प्रवाह’च्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेच्या सेटवर नुकताच पिठलं भाकरीचा बेत रंगला. या मालिकेत श्रीधरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षर कोठारीला पिठलं खूप आवडतं. त्याने त्याची आवड सेटवर सांगताच दुसऱ्याच दिवशी पिठलं भाकरीचा खास बेत आखण्यात आला. मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठलं बनवून आणलं. तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठलं आणून त्याला खास सरप्राइज दिलं. या अनोख्या मेजवानीने अक्षर खूपच भावूक झाला होता.

गेली ४९ वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४९ वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे. ‘सम्राट सराफ’ २४ ते ३० सप्टेंबर असं सप्ताहभर चालणार असून २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी ३ वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं.१’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पोलिसांच्या संवेदना दर्शवणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटानी सप्ताहाची सांगता होणार आहे.

Advertisement