Top Videos

Grid List

भारतात हॉलीवूडसारखे साय-फाय चित्रपट बनत नाहीत अशी नेहमीच ओरड केली जाते. लव्हस्टोरी अथवा अॅक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस निर्माते करताना दिसत नाहीत. इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि अनेको शास्त्रज्ञांची भुमी असणाऱ्या भारतात ना साहित्यामध्ये विज्ञान कथा आढळतात ना चित्रपटांमध्ये. सायन्स फिक्शनचा आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळत नाही. नेमक्या या कमतरेच्या फायदा घेत हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दर्जेदार इंग्रजी चित्रपटांच्या मोहजालात अडकवलं आहे.

बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.

अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रसिकांसाठी प्रदर्शित झाला. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत? आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे? हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या टिझरने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे.

कुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीनं गाणाऱ्या शाल्मली खोलगडेचं नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. अभिजात गायकी, आवाजाचा उत्तम पोत आणि क्लासिकल व्हाया पॉप अशा साऱ्याच विभागांत मुक्त संचार असणाऱ्या शाल्मलीच्या गाण्यांची मजा काही औरच! 'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय. केवळ दोनच दिवसांत फेसबुक आणि यूट्युबवर लाखांत मिळणारे लाईक्स आणि व्ह्युज् ने अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे.

यंदाच्या मोस्ट अवेटेड लकी चित्रपटाचे पहिले गाणे ‘कोपचा’ नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या गाण्याद्वारे लकीच्या निर्मात्यांनी 1983 मध्ये झळकलेल्या जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट दिले आहे. अमितराजने संगीत दिलेल्या ह्या गाण्याला डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि पॉप क्वीन वैशाली सामंतने गायले आहे. तर अभय महाजन आणि दिप्ती सतीवर हे गाणे चित्रीत झाले आहे.

It is always interesting to know how such beautiful photos are clicked by the photographers. Here we are talking about the Exclusive Holi photo of Marathi Actress Deepti Devi, who was clicked by Ace Photographer Vinayak Kulkarni. Watch exclusive behind the scene footage how this beautiful photo was created.

Here presenting the not so favorite nightmare of examination time! Timepass fame Dagadu aka Prathamesh Parab is all set with his new Marathi movie 35% Katthavar Pass directed and produced by Satish Motling. The movie will release on 20 May 2016.

EXCLUSIVE: Rupali Thorat's Swayamvar.

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी "मी पण सचिन" या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

व्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची हे गोष्ट आहे.

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका! पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.

"Show business is a very serious business", "Films works on 3 things Entertainment, Entertainment and Entertainment" are phrases associated with the film industry. When we talk about Marathi film industry, there are no celebrities as they say content is the king for Marathi films. So if there are no celebrities, then what should we call the actors, technicians and other personnels? They prefer to be called as artists. Artists who itch a memorable character through their lively performance on and off camera are remembered for ages to come. Dadasaheb Phalke, V. Shantaram, Bhalji Pendharkar, Arun Sarnaik, Kashinath Ghanekar, Ashok Saraf, Sachin Pilgoankar, Mahesh Kothare, Dada Kondke, Purushottam Bere, Laxmikant Berde are few of the Fillamshtars to remember here.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत.

Faded Mashup with Marugelara. Bharatnatyam Performance by Prajjakta Mali.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवं- कोरं गाणं घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. 'तू माझी ब्युटीक्वीन' च्या रेकॉर्डींगला नूकतीच पुण्यातील व्ही.एस.एच स्टुडिओ येथे उत्साहात सुरुवात झाली.

Advertisement