मराठीतला रॉकस्टार रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकरचं गेल्या महिन्यात ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला’ हे पहिलं मॅशअप आल्यावर आता रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग रिलीज झालंय. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं फ्रेंडशीप कव्हर साँग आलंय. ‘तेरा-यार हूँ मै- तेरी यारियाँ’ हे ह्या दोघांचे मॅशअप जेवढं सुमधूर आहे, तेवढाच गाण्याचा व्हिडीयोसुध्दा सुरेख चित्रीत केलेला आहे.

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. ह्या दोघांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट गाजवल्या असल्या तरीही रोहित-जुईलीने कधीही एकत्र पार्श्वगायन केले नव्हते. त्यामूळेच गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती. चाहत्यांची ही इच्छा आता ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’ ह्या रोहित-जुईलीच्या मॅशअपमूळे पूर्ण झाली आहे.

‘संभळंग ढंभळंग’ आणि ‘चांदनी’ ह्या सुपरहिट गाण्यांनंतर टियाना प्रोडक्शन्स अजून एक धमाल गाणे घेऊन आले आहेत. हे गाणे रॉकस्टार रोहित राऊतने गायले आहे. ‘संभळंग ढंभळंग’ आणि ‘चांदनी’ ही गाणी सध्या परदेशातल्या रेडियो स्टेशन्सवर चालत आहेत. आणि आता रोहित राऊतने गायलेले ‘प्रित तुझी’ गाणे लाँच होताच ह्या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामूळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते – पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आलीय. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... अशी आणि असंख्य वर्णने आईबाबतीत ऐकायला मिळतात. आई म्हणजे माणसातील देवच जणू. मग अशा आईसाठी आपण काय करतो.. मातृदिनानिमित्त असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला आहे 'सांग ना गं आई तुला काय हवे' या नव्या कोऱ्या गीतातून. नक्की पहा आणि अनूभवा त्यातील हृदयस्पर्शी अर्थ.

गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे.

Advertisement