ज्यांच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो. आपल्या शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना ज्यांनी खळखळून हसविले, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे... या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.

'कॉमेडीकिंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान'चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार? ही प्रतीक्षा अखेर संपली असून 'नशीबवान' चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे.

माणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याचीच झलक दाखवायला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. प्रेम प्रकरण आणि लग्न तसेच प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मजेशीररित्या या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या ऊभ्या राहिल्या त्यांच्या पर्यंत या विकासाचा लाभ पोहोचला नाही. विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आज लाँच झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे.

Advertisement