प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. ह्या त्रेधातिरपिटी मधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग ह्या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील.”

शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे, या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा गमतीशीर टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते.

Actress Sai Tamhankar needs no introduction. She is one of the very few Marathi Artists to achieve recognition internationally. Sai has been a part of Bollywood movies including Black & White & Ghajani. She bagged a lead role in Hunterrr, a 2015 Indian adult comedy movie written and directed by Harshavardhan Kulkarni which starred Gulshan Devaiah and Radhika Apte.

मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. 'एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम... प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने केलेली धडपड दाखविणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.

Advertisement