सनई-चौघडे, वरात घाई, नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमातील 'ओ साथी रे' हे भावनिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईट्सवर लाँच करण्यात आले आहे. उत्कृष्ट संगीत, गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध - श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे.

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'बॉईज २' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच ! अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीतदिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.

मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

'अटकमटक' चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल. धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले हे विनोदी गाणे, 'माझा अगडबम' सिनेमातील 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे.

मातीच्या गोळ्यापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार... रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप... साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती... हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या आगामी चित्रपटातलं हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं.

लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील नवरोजी हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.

Advertisement