लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील नवरोजी हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.

'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हि दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत शामिल करून घेत आहेत. विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' च्या धम्माल सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले हे गाणे, सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील युथफुल मस्ती प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट 'अगडबम' च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.

पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच रॉमेंटीक गाणे लाँच करण्यात आले. 'हे वेड आहेस तू' असे या गाण्याचे बोल असून, सुबोध आणि श्रुतीची लव्ह केमिस्ट्री यात पाहायला मिळते. तसेच, या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल आपल्याला दिसून येत असून, तेथील गगनचुंबी इमारती पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतात.

सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत 'पार्टी' या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. 'काळजात घंटी वाजते' असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली गुलाबी दुनिया या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या सिनेमातील प्रमुख कलाकारांवर हे रॉमेंटीक गाणे चित्रित करण्यात आलेले आहे.

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.

Advertisement